खडसे महाविद्यालयात क्रांती दिन व विश्व आदिवासी दिवस उत्साहात

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । श्रीमती जी.जी.खडसे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व भूगोल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांती दिन व विश्व आदिवासी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.एच. ए. महाजन उपस्थित होते तर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून प्रा.एस.एन.पाटील भूगोल विभाग उपस्थित होते.

आपल्या मार्गदर्शनपर भाषणात प्रा. पाटील यांनी ‘प्राचीन ते अर्वाचीन मानव क्रांती’ या विषयावर मार्गदर्शन करताना भूगोल विषयातील आदिवासींचा भूगोल आणि आदिवासी लोकांचे पर्यावरण विषयी असलेले विचार मांडले. तसेच विश्व आदिवासी दिनाचा इतिहास सांगितला त्यासोबतच ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त भारत देश हा क्रांतिकारकाचा देश आहे आणि त्याचा सार्थ अभिमान आपण प्रत्येकाने बाळगला पाहिजे असे आवाहन केले.

देशातील सामान्य लोकांनी व क्रांतिकारकांनी ब्रिटिशांना ‘भारत छोडो’ ची हाक दिली होती त्यामुळेच देशाला स्वातंत्र्य मिळाले होते. हे प्रत्येक भारतीयांच्या मनात कोरले गेले पाहिजे. परंतु आज क्रांती दिनाच्या आणि विश्व आदिवासी दिनाच्या निमित्ताने आज देशाला ‘भारत जोडो’ अभियानाची सुद्धा गरज आहे अशी आशा व्यक्त केली.

अध्यक्षीय भाषणात प्रभारी प्राचार्य महाजन यांनी विश्व आदिवासी दिन आणि ऑगस्ट क्रांती दिनाच्या शुभेच्छा देऊन मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.ए.पी. पाटील, भूगोल विभाग प्रमुख प्रा. पी. पी. लढे प्रा.डॉ. अतुल बडे प्रा. राजन खेडकर आणि प्रा. एन. जी. सरोदे यांची विशेष उपस्थिती होती.

या कार्यक्रमाचे संपूर्ण संयोजन एनएसएस कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. दीपक बावस्कर, प्रा.डॉ. ताहीर मिर व प्रा. विजय डांगे यांनी केले. या कार्यक्रमासाठी एनएसएस विद्यार्थी स्वयंसेवक कुणाल भारंबे, तेजस सरोदे, निखिल रायपुरे व ज्ञानेश्वर पाटील यांनी सक्रिय सहभाग घेतला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितल भोई हिने प्रास्ताविक प्रा. विजय डांगे तर आभार प्रदर्शन सपना वंजारी हिने केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक बंधू-भगिनी, विद्यार्थी आणि कर्मचारी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता.

Protected Content