जि. प. सदस्य प्रभाकर सोनवणे यांना धमकी : ‘त्या’ मद्यधुंद पोलिसांचे अखेर निलंबन …!

यावल, प्रतिनिधी । जळगाव मुख्यलयात कार्यरत दोघा पोलीस कर्मचाऱ्यांनी काल रात्री काँग्रेसचे तालुका अध्यक्ष तथा जि. प. सदस्य प्रभाकर सोनवणे यांच्या चारचाकीगाडीचा रस्ता अडवुन त्यांना धमकी दिल्याने दोघा पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.

चोपडा यावल या मार्गावर पोलीस कर्मचारी बकल क्रमांक ४१६ जितेंद्र रोहिदास पांडव व पोलीस कर्मचारी बकल क्रमांक ३३१७ हेमंत प्रमोद सोळंके, दोघे पोलीस कर्मचारी जळगाव पोलीस मुख्यालय येथे नेमणुकीस आहेत. त्यांनी शुक्रवार दि. १० जुलै रोजी मद्यधुंद अवस्थेत भुसावळ ते जळगाव यावल मार्गे त्यांच्या ताब्यातील हुंडाई मोटर कार क्रमांक एम एच १९ BU-०२६० या कारव्दारे जात असतांना रात्रीच्या सव्वा आठच्या सुमारास यावल कृषी विभाग कार्यालय, जवळ चोपडा रोड यावल येथे रोडवर पोलीस कर्मचारी यांनी त्यांच्या ताब्यातील इनोवा कंपनीच्या मोटर कार क्रमांक एमएच १९ डब्ल्यू ३४३४ या कार ने काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य जळगाव प्रभाकर अप्पा सोनवणे रा. वढोदे तालुका यावल यांच्या कारला उलट दिशेने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात कट मारून, बेदरकारपणे त्यांच्या मोटरकार समोर आडवी उभी करून त्यांच्याशी हुज्जत घातली व त्यांना शिवीगाळ करून काठीने मारण्यास धावून गेले‌. सदरच्या घडल्या प्रकाराबद्दल या जळगाव येथील मुख्यालयात कार्यरत असलेला दोघ पोलीस कर्मचारी यांची आरोग्य तपासणी केली असून त्यांच्यावर कलम २७९, ५०४, ५०६ , ३४प्रमाणे भादवी सह मोटर व्हीकल कायदा कलम १८४ १८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या ताब्यातील ते चारचाकी मोटरकार वाहन पोलीस निरिक्षक अरुण धनवडे यांनी ताब्यात घेतले आहे . दरम्यान फैजपुरचे विभागीय पोलीस अधीकारी नरेन्द्र पिंगळे यांनी तात्काळ यावल पोलीस स्टेशनला भेट देवुन घडलेल्या घटनेची सखोल माहिती घेतली आहे. सदरच्या घडलेल्या घटनेतील पोलीस कर्मचारी जितेन्द्र रोहीदास पांडव आणी हेमंत प्रमोद सोळंके यांनी मद्यधुंद अवस्थेत केलेली बेशिस्त वागणुकीबद्दल त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक यांच्याकडे पाठण्यात येत असल्याची माहीती पोलीस सुत्रांकडुन प्राप्त झाली आहे.

Protected Content