भुसावळात घरातून दिड लाखांचे दागिने लांबविले

भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ शहरातील पु.ओ.नाहाटा महाविद्यालया समोरील मोकळ्या जागेवर राहत असलेल्या कुटुंबियांच्या घरातील पेटीतील सुमारे दिड लाख रूपये किंमतीचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना गुरुवारी शहरात उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी चितोडिया यांच्या फिर्यादिवरून भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

याबाबत माहिती अशी की, रामसिंग गोपाळ सिंग चितोडिया यांनी पालमध्ये असलेल्या पेटीत सुमारे दीड लाखांचे दागिने ठेवले असता चोरट्यांनी ते लांबवले. रामसिंग चितोडीया यांचा या ठिकाणी जडीबुटीची औषधे विकण्याचा व्यवसाय असून ते त्यांच्या झोपडीतील पेटीत १ लाख ५२ हजार ५०० रुपये सोन्याचे दागिने आणि ५ हजार रुपये रोख ठेवले असता अज्ञात चोरट्यांनी ते चितोडीया हे झोपेत असताना लंपास केलेले आहे. शुक्रवारी बाजारपेठ पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या घटनेनंतर बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप भागवत, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी हे करीत आहेत.

Protected Content