बस महामंडळाचा भोंगळ कारभार; नादुरुस्त बस गाड्यांमुळे प्रवासी हैराण

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथे अमळनेहून शिरपुरला जाणारी बस अचानक नादुरूस्ती होवून बंद पडली. बस महामंडळाच्या भोंगळ कारभारामुळे दुसरी बस येण्याला लागला तीन तास लागल्याने यामुळे प्रवाशी चांगलेच हैराण झाले होते.

याबाबत अधिक माहिती अशी की,  कळमसरे येथे सोमवार २० नोव्हेंबर रोजी अमळनेरहून ३ वाजता सुटणारी, मारवड, कळमसरे, शहापूर मार्गे  शिरपूरला जाणारी  बस क्रमाक(एमएच ०६ एस ८४८८) ही गाडी कळमसरे येथे सुमारे ४ वाजता(नादुरुस्त) पंचर झाली. ही बाब चालकाच्या लक्षात आल्यावर त्यांनी गाडी बाजूला लावली. चालक आणि वाहक यांनी लगेचच अंमळनेर आगारात बाविस्कर यांच्याशी संपर्क साधला व गाडी पंचर झाल्याचे सूचित केले. व दुसरी गाडी दुरुस्तीसाठी पाठवण्याचे कळवले. परंतु पाऊणे सहा वाजले तरीही गाडी येत नाही म्हणून कळमसरे गावाचे नागरिक मोतीलाल महाजन यांनी आगार प्रमुखांशी संपर्क साधला असता विचारपूस केली. आगार प्रमुखांनी मला आताच १५ मिनिटांनतर कळाले असे उत्तर दिले. तसेच लवकरात लवकर दुसरी गाडी पाठवण्याचे  आश्वासन दिले. रात्रीचे ७ वाजले तरीही गाडी येत नाही म्हणून प्रवशानी कल्लोळ करत वाहचालक व वाहक यांना जाब विचारू लागले.

काही प्रवशी निराश होऊन माघारी फिरले तर काही प्रवाशी आपल्या नातेवाईकांना बोलावून पर्यायी मार्गाने माघारी परतले  तर काही प्रवाशांना नाईलाजास्तव ताटकळत बसावे लागले. यामुळे पुढील प्रवास करायचा कसा प्रश्न  निर्माण झाला.  रात्री साडेसात वाजेच्या सुमारास नवीन बस पाठवण्यात आली. तेव्हा राहिलेले प्रवाशी गाडीत बसून पुढील प्रवसाला निघालेत. परंतू अशा भोंगळ कारभाराबद्दल तुम्ही काय म्हणणार?  प्रवाशांना सुमारे साडेतीन तास ताळकळत बसावे लागले याला जबाबदार कोण?, अमळनेर बस आगाराचे गचाळ नियोजनाबाबद्दल आपण काय म्हणू शकता ?

एस.टी. बसमध्ये स्टेपनी आहे कि नाही, याची शहाणीशा खात्री का होत नाही?. टोल फ्री क्रमांकलावला असता,का लागला नाही याबद्दलही आता महाराष्ट्र परिवहन मंडळाने जनतेला उत्तर द्यावे. अशी जनमानसात चर्चा आहे.

Protected Content