खा.पवारांच्या वाढदिवसानिमित्त उत्साहात झाली व्हर्चुअल रॅली

अमळनेर, प्रतिनिधी | राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार शरद पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त व्हर्चुअल रॅली आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अमळनेरात संपन्न झाली. खा. शरद पवारांच्या उपस्थितीत येणाऱ्या काळात मतदारसंघात शेतकरी मेळावा घेण्यावर चर्चा तसेच इतर पक्षातील दिग्गज पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश यावेळी झाल्याने हा कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरला.

 

 

जी. एस..हायस्कूल येथील आयएमए हॉलमध्ये व्हर्च्युअल या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना आमदार अनिल पाटील यांनी येणाऱ्या काळात पक्षबांधणी व संघटन मजबूत करण्यावर भर देऊन,नगरपालिका,जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका डोळ्यामोर ठेऊन कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचे आवाहन केले..पक्षात क्रियाशील असणाऱ्या पदाधिकाऱ्यांनाच येथून पुढे नियुक्ती व तिकीट वाटप होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सदस्यता मोहिमेला सुरवात
आगामी काळ हा निवडणुकांचा असल्या कारण्याने प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार मतदारसंघात सदस्यता नोंदणी मोहिमेला सुरवात करण्यात आली. जि.प.सदस्या जयश्री पाटील यांची नोंदणी करून महिला तालुकाध्यक्षा मंदाकिनी पाटील यांच्या हस्ते त्यांचा फॉर्म भरण्यात आला.आमदार अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाने संपूर्ण मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर सभासद नोंदणी मोहीम राबविण्यात येणार असून याद्वारे महिला,युवक व वंचित घटकांना पक्षाच्या ध्येयधोरणांशी जोडले जाणार आहे.

दिग्गज कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश
खा.शरद पवारांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत मतदारसंघातील सर्व जातीधर्मातील पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी आमदार अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. सर्वच समाज बांधवांना सोबत घेऊन मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे आमदारांनी सांगितले. यावेळी मंगरूळ येथील शेतकी संघाचे माजी व्हाईस प्रेसिडेंट दीपक बागुल, ग्रा.प.सदस्य बापू लोटन पाटील, वि.का.सो.संचालक जिजाब अभिमन पाटील, रमेश बागुल,भटू गोरख पाटील,सयाजी गणेश पाटील,कैलास पाटील,भटू पाटील,हिरालाल पाटील,अनिल पाटील,शशिकांत पाटील,देविदास बागुल,निंब येथील हिलाल छन्नू कोळी,पत्रकार व ओबीसी महासंघाचे विभागीय प्रसिद्धीप्रमुख जयवंत वानखेडे तसेच अण्णाभाऊ साठे ग्रुप चे प्रकाश बोरसे,हरीचंद्र कढरे,नारायण गांगुर्डे,बाजीराव कढरे, डॉ.राजेंद्र कांबळे,सुरेश कांबळे,ललित बोरसे,बापू जगदाणे, हरीचंद्र पाटील,मुकेश जाधव,आकाश अवचिते,विमलबाई गरुड,बापू चिंधा जगदाणे, इंदूबाई कढरे,मीराबाई कढरे,गंगाधर कढरे,पुष्पाबाई भालेराव,वत्सलबाई कढरे,शरद कढरे,दीपक गरुड,संतोष शिरसाठ,सागर आवाचिते,अनिल मरसाळे यांनी प्रवेश केला.

केशवा व्हिजन चे उत्कृष्ट आयोजन 

यावेळी केशवा आय.टी.व्हिजन चे गणेश भामरे व त्यांच्या टीम चा सलग दुसऱ्या वर्षी व्हर्च्युअल रॅली च्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाला जि.प.,प.स. व नगरपालिकेच्या इच्छुकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.यावेळी पक्षाच्या सर्वच फ्रंटलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.माजी नगरसेवक विनोद कदम यांनी सूत्रसंचालन तर आभार तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनी मानले.

Protected Content