सैनिकांच्या कुटुंबीयांना मोफत उपचार : रावेर येथील डॉक्टर पाटील दाम्पत्याचा स्तुत्य उपक्रम

रावेर, प्रतिनिधी | जीवाची बाजी लावत देश सेवा करणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबियांची सेवा करण्याचे व्रत स्त्रीरोग तज्ञ डॉ . संदीप पाटील व त्यांची पत्नी डॉ. योगिता पाटील हे दाम्पत्य मागील वर्षापासून अविरतपणे करत आहे.

 

जीवाची बाजी लावत सीमेवर लढणाऱ्या सैनिकांमुळे देश आज सुरक्षित आहे . घरदार , कुटुंब सोडून देशासाठी प्रसंगी बलिदान देणाऱ्या सैनिकांकडे समाजाचे फारसे लक्ष जात नाही. मात्र देश सेवा करणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबाची सेवा करता यावी , असा विचार येथील स्त्रीरोग तज्ञ डॉ. संदीप पाटील यांच्या मनात आला. वैद्यकीय क्षेत्रात काम करत असल्याने या सैनिकांची सेवा करण्याची संधी व त्याद्वारे देशसेवेसाठी डॉ. पाटील व त्यांच्या पत्नी डॉ.योगिता पाटील हे दांपत्य गेल्या वर्षभरापासून सैनिकांच्या पत्नी, बहीण किंवा मुलीला प्रसुतीपूर्व व प्रसूती पश्चात वैद्यकीय सेवा अगदी मोफत पुरवत आहेत. सैनिकाच्या पत्नी , मुलगी अथवा बहिणीचे आरोग्य विषयक उपचाराचे मोफत निदान व प्रसूती करणारे जिल्ह्यातील कदाचित पाटील हे एकमेव डॉक्टर असावेत. ते वर्षभरात किमान १०० सैनिकाच्या नातेवाईक महिला रुग्णांवर उपचार करतात. यात सैनिकांच्या पत्नीची नॉर्मल प्रसुती , सीजर, नियमीत आरोग्य तपासणी केली जाते.

सैनिक परिवाराच्या सेवेमुळे देशसेवेचा आनंद
प्रसुती काळात रुग्णाला मदतीची खुप गरज असते. त्यावेळी त्याला आपलेपणा, आधार मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करतो. सैनिकांच्या पत्नीची काळजी घेवून त्यांना हिम्मत व साथ देण्याचा प्रयत्न केला जातो. यातूनच देशसेवा केल्याचा आनंद मिळत असल्याचे स्त्रीरोग तज्ञ डॉ संदीप पाटील यांनी सांगितले.

सैनिकांची सेवा ही देशसेवाच
सैनिक रात्रंदिवस देशाच्या सीमेवर राहून देशाला सुरक्षित ठेवण्याचे काम करीत आहेत. त्याचवेळी सैनिकांची पत्नी, बहीण अथवा मुलगी प्रसुतीपूर्व व प्रसूती पश्चात उपचारासाठी स्त्री रोग तज्ज्ञांकडे जातात. मात्र सैनिकांच्या कुटुंबातील या महिलांना अनेक वेळा आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो.

Protected Content