नेहरू चौक मित्र मंडळतर्फे ‘जळगावच्या राजा’चे उद्या पाटपूजन

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  येथील श्री नेहरू चौक बहुउद्देशीय मित्र मंडळातर्फे रविवार, दि. ३१ जुलै रोजी संध्याकाळी ५ वाजता जळगावच्या राजाचे पाटपूजन व मंडप सोहळा महानगरपालिकेच्या इमारतीखाली आयोजित करण्यात आला आहे. यावेळी लक्षवेधी अशा ढोल पथकाचे सादरीकरण होणार आहे.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नेहरू चौक मित्र मंडळ तर्फे जळगावचा राजा श्री गणपती यांच्या पाटपूजन व मंडप सोहळा आयोजित करण्यात आला आहे. नीरज अग्रवाल हे सपत्नीक पाटपूजन करणार आहेत. यावेळी आकर्षक असे ढोल पथकाचे सादरीकरण करण्यात येणार आहे.

यासह नेहरू चौक रांगोळी व फुलांनी सुशोभित करण्यात येणार आहे. यावेळी भाविक पारंपारिक वेशभूषामध्ये उपस्थिती देणार आहेत. नागरिकांनी व भाविकांनी संध्याकाळी ५ वाजता महानगरपालिकेच्या इमारतीखाली वेळेवर उपस्थिती द्यावी,  असे आवाहन अध्यक्ष अजय गांधी व मंडळातर्फे करण्यात आले आहे.

Protected Content