भुसावळातील डॉ.उल्हास पाटील सीबीएसई स्कूलमध्ये गणेशोत्सवास प्रारंभ

भुसावळ -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम सीबीएसई स्कूल येथे मंगळवार दिनांक १९ सप्टेंबर रोजी सकाळीच श्री गणेशाची विधीवतपणे स्थापना करण्यात आली.

 

याप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील व सचिव डॉ.वर्षा पाटील या दांम्पत्याच्या हस्ते महाआरती करण्यात आली. गणेशाला आवडणारे लाडूचे यावेळी प्रसाद स्वरुपात वाटप करण्यात आले. याप्रसंगी उपस्थीत शिक्षक-शिक्षिकांनी अथर्वशिर्षाचे सामूहिक पठण केले. याप्रसंगी शाळेच्या प्राचार्या अनघा पाटील ह्या देखील उपस्थीत होत्या.

Protected Content