Home धर्म-समाज पाचोऱ्यात ठाकरे गटातर्फे चित्रकला रंगभरण स्पर्धांचे आयोजन

पाचोऱ्यात ठाकरे गटातर्फे चित्रकला रंगभरण स्पर्धांचे आयोजन

0
76


पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शिवसेना पक्षप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पाचोरा येथील भडगाव रोडवरील शिवतीर्थ मैदानावर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली नरेंद्रसिंह सुर्यवंशी आयोजित चित्रकला रंगभरण स्पर्धा रविवारी आयोजन करण्यात आले होते.

यास्पर्धेचे उद्घाटन वैशाली सुर्यवंशी यांनी केले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुका प्रमुख शरद पाटील, शेतकरी सेनेचे तालुका प्रमुख रमेश बाफना, शहर प्रमुख अनिल सावंत, भरत खंडेलवाल, संदिप जैन, हर्षल देवरे, निर्मल इंटरनॅशनल स्कुलचे प्राचार्य गणेश राजपूत, उपप्राचार्य प्रदिप सोनवणे, संतोष पाटील, नंदू पाटील, सुनील पाटील, समाधान पाटील यांचेसह उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रंगभरण स्पर्धा १ ली ते ४ थी (अ गट), ५ वी ते ७ वी (ब गट), ८ वी ते १० वी (क गट) व १० वी ते पदवीधर (ड गट) अशा चार गटात आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत विविध शाळातील सुमारे ८०० ते ९०० विद्यार्थी, विद्यार्थीनींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला होता.


Protected Content

Play sound