यावल येथे भाजयुमोतर्फे चित्रकला स्पर्धा उत्साहात

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून “परीक्षा पे चर्चा” हा कार्यक्रम एक भारत श्रेष्ठ भारत यातून राबविण्यात येत आहे. तरी देशातील मुलांना त्याच्या कडील कौशल्य व विविध गुणांना वाव मिळण्यासाठी खालील विषयांवर भारतीय जनता पार्टी तर्फे इयत्ता९ ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला घेण्यात आलेल्या स्पर्धा उत्साहात घेण्यात आले.

तालुक्यातून प्रथम क्रमांकाचे पारितोषीक मिताली व्यंकटेश बारी, द्वितीय क्रमांकाचे पारितोषीक मानसी निलेश अमोदकर व तृतीय क्रमांक पारितोषीक इशा निलेश गडे या विद्यार्थ्यांना रावेर लोकसभेच्या खासदार रक्षाताई खडसे यांच्या हस्ते ट्रॉफी, प्रशस्तीपत्रक व बक्षीस तसेच उतेजानार्थ १० विद्यार्थ्यांना व विद्यार्थीनींना प्रशस्तीपत्रक व बक्षीस वितरीत करण्यात आलीत.

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी (फक्त इ.९ ते १२ वी) नाव नोंदणी ऑनलाईन पध्दतीने नोंद करण्यात आली. सदर परीक्षा रावेर लोकसभा क्षेत्रातील चोपडा, यावल, रावेर, भुसावळ मुक्ताईनगर, बोदवड व जामनेर अशा वेगवेगळ्या तालुक्यात आयोजित करण्यात आल्या होत्या.

याप्रसंगी खा.रक्षाताई खडसे, कृउबाचे माजी सभापती तथा भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष|हिरालाल चौधरी, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष नारायण चौधरी, भाजपाचे तालुका अध्यक्ष उमेश फेगडे, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, कृउबाचे माजी उपसभापती व भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष राफेश फेगडे, जिल्हा परिषदच्या सदस्या सविता अतुल भालेराव, माजी नगरसेवक डॉ कुंदन फेगडे, पंचायत समितीचे माजी उपसभापती दिपक पाटील, वड्री सरपंच अजय भालेराव, भाजपाचे सरचिटणीस विलास चौधरी, उज्जैनसिंग राजपुत, भाजपाचे शहराध्यक्ष डॉ. निलेश गडे यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी कार्यक्रमास उपस्थित होते.

या पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पी एस सोनवणे यांनी केले. या संपुर्ण स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सागर कोळी (भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष ) व्यंकटेश बारी, (भाजपा युवा मोर्चा तालुका सरचिटणीस ) योगेश खेवलकर (भाजपा युवा मोर्चा तालुका सरचिटणीस ) रितेश बारी, (भाजपा युवा मोर्चा यावल शहराध्यक्ष ) यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

Protected Content