नाथाभाऊंच्या निकटवर्तीयांच्या भूमिकेकडे लक्ष

रावेर प्रतिनिधी । माजी मंत्री एकनाथराव खडसे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता त्यांचे निकटवर्तीय असणारे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भाजपाचे दिग्गज नेते एकनाथराव खडसे राष्ट्रवादीत प्रवेश जवळ-जवळ निश्‍चित मानली जात आहे. त्यामुळे रावेर तालुक्यातीत भाजपाचे महत्वाच्या पदावर असलेले खडसे यांच्या जवळचे मानले जाणार्‍या लोकप्रतिनिधी पदाधिकार्‍यांच्या भूमिकेकडे तालुक्याचे विशेष लक्ष लागले आहे.

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या जवळचे तथा भाजपा कडून महत्वाच्या पदावर असलेले खडसे यांना मानणारे झेडीपी अध्यक्ष रंजनाताई पाटील, पंचायत समिती सभापती जितेंद्र पाटील, सावदाचे नगराध्यक्ष सौ. यवले यांच्यासह इतर काही पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य यांच्या भूमिकेकडे देखील लक्ष लागले आहे.सद्या तरी एकनाथराव खडसे यांच्या विषयावर सर्व बोलायला टाळताय.तसेच काही माजी मंत्री खडसे राष्ट्रवादीत प्रवेश झाल्या नंतर आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.

Protected Content