ई-पॉज मशीन तांत्रिक अडचणी निवारण करा ; अन्यथा १ एप्रिल रोजी मशीन जमा करणार

रेशन दुकानदार संघटनेचा तहसीलदारांना निवेदनाद्वारे दिला इशारा

यावल, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी – धान्य वितरणासाठी वापरण्यात येत असलेल्या ई पॉज मशीनवर नेहमीच तांत्रिक अडथळे येत आहेत. यामुळे ई–पॉज मशीनमधील तांत्रिक अडचणी निवारण ३१ मार्चच्या आत करा, अन्यथा १ एप्रिल रोजी यावल तालुक्यातील सर्व रेशनदुकानदार ई-पॉज मशीन प्रशासनाकडे जमा करणार असल्याचा ईशारा रेशन दुकानदार संघटनेने यावल तहसीलदारांना निवेदनाद्वारे दिला आहे.

आधार संलग्न असलेल्या सार्वजनिक धान्य वितरण प्रणालीत येत असलेल्या तांत्रिक अडचणीमुळे गेल्या दोन ते तीन महिन्यापासून शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्य वितरणाचा लाभ देणे अवघड झाले आहे. बहुतांश ठिकाणी रेशनदुकानावर धान्यसाठा आहे. परंतु त्या दुकानात ई-पॉज मशीनवर धान्य उपलब्ध नाही, तर ज्या मशीनीवर धान्यसाठा उपलब्ध आहे, त्या दुकानावर धान्य पुरवठा झालेला नाही. बऱ्याच स्वस्त धान्य दुकानावरील ई-पॉज मशीन्स मुदत बाह्य आहेत.त्यामुळे शिधापत्रिका धारकांना धान्य लाभ देणे अशक्य आहे, पर्यायाने सर्वसामान्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. सर्वर डाऊन च्या तांत्रिक अडचणीमुळे आधार प्रमाणीकरण होऊ शकत नसल्याने पीएमजीकेवाय योजनेतील मोफत धान्य पुरवठा होऊ शकत नाही. या मशीन्स मोबाईल नेटद्वारे वापर होत असल्याने रेशन दुकानदारांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे, या ई-पॉज मशीनमधील तांत्रिक अडचणी निवारण ३१ मार्चपूर्वी करण्यात यावे, अन्यथा १ एप्रिल रोजी सर्व स्वस्त धान्य दुकानदार प्रशासनाकडे ई-पॉज मशीन करणार असल्याच्या आशयाचे निवेदन जिल्हा प्राधिकृत स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसीन परवानाधारक संघटनेतर्फे यावल तहसीलदार महेश पवार यांना निवेदन  देण्यात आले.
यावेळी यावल तालुकाध्यक्ष बाळकृष्ण नेवे, उपाध्यक्ष शेख अब्दुल्ला, सचिव दिलीप मोरे, दिलीप नेवे, अजय कुचेकर आदीं रेशनदुकानदार उपस्थित होते.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!