Home Cities जळगाव विधानपरिषद निवडणुकीच्या दिवशी नागरिकांसाठी पर्यायी कार्यालयांची सुविधा

विधानपरिषद निवडणुकीच्या दिवशी नागरिकांसाठी पर्यायी कार्यालयांची सुविधा

0
10


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । विधानपरिषद निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी नागरिकांना शासकीय कामकाजाशी संबंधित अडचणी उद्भवू नयेत यासाठी जिल्हा प्रशासनाने पर्यायी कार्यालयांची व्यवस्था केली आहे. मतदान केंद्र असलेल्या ठिकाणच्या नियमित कार्यालयांऐवजी नागरिकांनी दिलेल्या पर्यायी कार्यालयांशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी जळगाव स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक 2026 ची घोषणा केली असून, 18 जून 2026 रोजी जिल्ह्यातील सात मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर मतदानाच्या दिवशी काही कार्यालयांमध्ये नियमित कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन ही पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.

प्रशासनाने जाहीर केलेल्या व्यवस्थेनुसार अमळनेर येथील तहसीलदार कार्यालयाऐवजी नागरिकांनी उपविभागीय अधिकारी, अमळनेर यांच्याशी संपर्क साधावा. फैजपूर येथे नगर परिषद सभागृहाऐवजी उपविभागीय अधिकारी, फैजपूर कार्यालय उपलब्ध राहणार आहे. भुसावळ येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयाऐवजी तहसील कार्यालय, भुसावळ येथे नागरिकांच्या अडचणी सोडविण्यात येतील.

जळगाव शहरासाठी तहसीलदार कार्यालयाऐवजी उपविभागीय अधिकारी, जळगाव कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. एरंडोल येथे कर्मवीर अभ्यासिका नगर परिषद कार्यालयाऐवजी उपविभागीय अधिकारी, एरंडोल कार्यालय पर्यायी व्यवस्था म्हणून उपलब्ध राहणार आहे.

तसेच पाचोरा येथे तहसीलदार कार्यालयाऐवजी उपविभागीय अधिकारी, पाचोरा आणि चाळीसगाव येथे तहसीलदार कार्यालयाऐवजी उपविभागीय अधिकारी, चाळीसगाव कार्यालयाशी नागरिकांनी संपर्क साधावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

ही पर्यायी व्यवस्था केवळ 18 जून 2026 रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवसापुरती मर्यादित राहणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, जळगाव वैशाली चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.


Protected Content

Play sound