खामगाव रूग्णालयातील प्रसुती सुविधेबाबत वैद्यकीय अधिक्षकांशी साकारात्मक चर्चा

खामगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । येथील सामान्य रुग्णालयात प्रसूती रुग्णांना सुविधांअभावी त्रास सहन करावा लागत आहे. ही बाब भाजयुमो व विद्यार्थी आघाडीला कळताच त्यांनी रुग्णालय गाठले आणि यावेळी वैद्यकीय अधिक्षकांशी सकारात्मक चर्चा करुन यासंदर्भात निवेदन देण्यात आले.

येथील सामान्य रुग्णालयात उत्तम आरोग्य सुविधा आहेत. परंतु गेल्या काही दिवसांपासून येथील प्रसूती विभागात रुग्णांना असुविधा होत असल्याच्या तक्रारी भाजप युवा मोर्चाकडे आल्या. या तक्रारीची दखल घेत आज भाजप जिल्हाध्यक्ष तथा आमदार अॅड आकाश फुंडकर यांचे मार्गदर्शनाखाली भाजयुमो खामगाव शहर व विद्यार्थी आघाडीचे पदाधिकारी  यांनी थेट सामान्य रुग्णालय गाठले व वैद्यकीय अधीक्षक डॉ. निलेश टापरे यांना निवेदन देऊन चर्चा केली.

भाजयुमो शहराध्यक्ष तथा रुग्ण कल्याण समिती सदस्य यांनी डॉ निलेश टापरे यांना प्रसूती विभागात रुग्णांना होत असलेल्या त्रासाबाबत माहिती दिली. या विभागातील काही वैद्यकीय अधिकारी रुग्णांना थेट न तपासता फोनवरूनच परिचरिकांना उपचाराबाबत सांगतात. तसेच अनेकांना येथे सुविधा उपलब्ध असताना अकोला रेफर करतात. यामुळे गरीब रुग्णांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो. असे काही प्रकार घडत असल्याची बाब उघडकीस आल्याने डॉ. निलेश टापरे यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. तसेच प्रसूती रुग्ण अकोला रेफर चे ऑडिट रिपोर्ट सादर करण्याचे आदेश त्यांनी संबंधितांना दिले आहेत. तसेच प्रसूती रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परंतु सर्वाना चांगली सुविधा देण्याचा प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

या सकारात्मक चर्चेला भाजयुमो शहराध्यक्ष राम मिश्रा यांचेसह भाजप विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष पवन गरड, शहराध्यक्ष शुभम देशमुख, भाजयुमो शहर संघटक, नगेंद्र रोहणकार, नगरसेवक  गणेश सोनोने, योगेश आळशी, प्रसाद एदलाबादकर, मयुर घाडगे, रोहन जैस्वाल, यश आमले, विक्की हटटेल, कल्पेश बजाज, शशांक वक्टे रुपेश शर्मा, विकास चवरे, बापु देशमुख, श्रीकांत जोशी, भावेंद्र दुबे, मोहित ठाकूर, पवन तनपूरे, निलेश हातेकर, हितेश पदमगीरवार, मुन्ना पेसोडे, सोनु नेभवाणी, लोकेश वानखडे, विनय शर्मा, पंकज सरकटे, विजय पदमगिरवार, निखील नथ्थानी, हरीष सारसर, रमेश इंगळे, रोशन गायकवाड, आकाश बडासे  यांच्यासह भाजपा युवा मोर्चा व विद्यार्थी आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थ‍ित होते. तर प्रसूती विभागातील असे प्रकार परत घडल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करून रुग्णांना न्याय मिळवून देऊ असा इशाराही भाजयुमो शहराध्यक्ष राम मिश्रा यांनी दिला.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!