बुलढाणा येथील आंदोलनास पाचोरा व भडगाव येथील नेत्यांची भेट

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । पाचोरा व भडगाव येथील इपीएस ९५ राष्ट्रीय संघर्ष समितीतर्फे आंदोलन करण्यात येत असून या नेत्यांनी बुलढाणा येथील उपोषण मंडपास भेट दिली आहे.

पाचोरा येथील इ. पी. एस. ९५  नेत्यांनी बुलडाणा उपोषण मंडपास भेट दिली. यामध्ये जेष्ठ नेते अनिल पवार, तालुकाध्यक्ष नंदलाल बोदडे यांचेसह अरुण धामणे, दिलिप झोपे, प्रकाश समदानी, वसंत गवांदे, हरिष अदिवाद, राजेंद्र चव्हाण, संतोष पाटील, श्रीराम चौधरी, मधुकर खेडकर, दिपचंद ढाकरे, गुलाबराव जाधव (भडगाव), भिकन मनोरे (भडगाव) यांचा समावेश होता.

या प्रसंगी त्यांचा सत्कार बुलढाणा टीमच्या वतीने करण्यात आला. व उपस्थित मान्यवरांपैकी अनिल पवार व नंदलाल बोदडे यांनी आपले विचार व्यक्त केले. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

तसेच पाचोरा तालुक्याच्या वतीने संघटनेला त्यांनी १ हजार १०० रुपये देणगी राष्ट्रीय अध्यक्षा शोभा आरास यांच्या सुपूर्द केली. यावेळी राजनंदगाव (छत्तीसगड) येथून आलेले जेष्ठ नेते एजाझ उर रहेमान यांचा देखील सत्कार करण्यात आला व त्यांनी देखील आपले विचार सविस्तर पणे मांडले.

 

Protected Content