नाभिक समाजास कोरोना विषाणु संसर्गापासुन संरक्षणासाठी किट देण्याची मागणी

जळगाव, प्रतिनिधी । कोरोना विषाणुचा संसर्ग प्रार्दुभाव रोखण्यासाठी मागील २७/२८ दिवसांपासून राज्यातील सर्व नाभिकांचे व्यवसाय बंद आहेत.नाभिक समाजाची आर्थिक परिस्थिती अत्यंत प्रतिकुल असुन व्यावसायिक आणि कारागीर व्यवसाय बंद असल्यामुळे आर्थिक अडचणीना सामोरे जात आहेत. त्यांना विशेष आर्थिक पॅकेज देऊन विमा स्वरक्षण देण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र नाभिक महामंडळातर्फे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

निवेदनाचा आशय असा की , महाराष्ट्र राज्यातील विविध ठिकाणी उच्चपदस्थ व्यक्ती संचारबंदी असतांना त्यांच्या पदाचा दुरुपयोग करून नाभिक समाज बांधवांवर दडपण टाकून घरी, शेतात, फार्म हाऊस येथे बोलावून दाढी, कटिंग करून घेत आहेत. यात कायद्याचे उल्लंघन झाल्याने नाभिक बांधवांवर विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल होत आहेत मात्र, दाढी, कटिंगसाठी बोलवणारे धनदांडगे मोकळे सुटत आहेत. हा नाभिक समाज बांधवांवर अन्याय असून अशा व्यक्तींविरुद्ध देखील गुन्हे दाखल करावेत अशी मागणी करण्यात आली आहे. लॉक डाऊन समाप्त झाल्यावर ग्राहक कटिंग, दाढी बनवून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी करतील. अशावेळी कोरोनाचा संसर्ग वाढण्याची दाट शक्यता असल्याने कोरोनापासून संरक्षण नाभिक बांधवांना मिळावे यासाठी राज्य शासनाने संपूर्ण नाभिक व्यावसायिक, कारागीर यांना वैद्यकिय सेवेत जसे संरक्षण किट,चष्मा, हॅन्ड ग्लोव्हज, ड्रेस दिला जातो तशी सुविधा पुरविण्याची व्यवस्था करावी. पन्नास लाखांचा विमा उतरवावा .घर व दुकान भाडे,थकीत कर्जाचे हप्ते व त्यावरिल दिर्य व्याज माफ करावे. यावर्गाला जिवन आवश्यक वस्तंचा पुरवठा करून प्रती महिना ५ हजार रु मदत देऊन विशेष पॅकेज जाहीर करावे.व संसर्ग नसलेल्या ऑरेंज व ग्रीन झोनमधील जिल्हयांमध्ये व्यवसाय सुरु करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर किशोर सूर्यवंशी, पृथ्वीराज सोनवणे, रवींद्र बोरनारे, राजकुमार गवळी, सुदामा कोरडे, राहुल जगताप आदींच्या स्वाक्षरी आहे.

Protected Content