कोरोना : भाजीपाला यार्डातील पाच व्यापाऱ्यांवर गुन्हा

किरकोळ भाजीपाला विकतांना केली कारवाई

जळगाव प्रतिनिधी । कोरोना पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सर्वत्र संचारबंदी असतांना भाजीपाला यार्डातील ५ दुकानदार किरकोळ भाजीपाला विक्री करून गर्दी केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शहरातील कृषी उत्पन्न बाजारी समितीच्या आवारात व्यापाऱ्यांच्या व्यतिरिक्त किरकोळ भाजीपाला विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे. या संदर्भात कृउबा बाजार समितीत टप्याटप्याने व्यापाऱ्यांनी कमी गर्दीत आपला व्यवहारा करावा असे आदेश‍ जिल्हाधिकारी यांनी दिले आहे. आज जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे आणि पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी भाजीपाला यार्डात पाहणी केली असता त्यांना किरकोळ भाजीपाला खरेदी करून घेऊन जातांना काही व्यक्ती दिसून आले. त्यांना विचारपूस केली असता हा बाजार आम्ही भाजीपाला यार्डमधून खरेदी केल्याचे सांगितले.

जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षक यांनी कृउबाचे सभापती कैलास चौधरी यांना बोलावून सदरील भाजीपाला यार्डमधील व्यापाऱ्यांची चौकशी करण्याच्या सुचना दिल्यानंतर त्यांनी कृउबा सभापती चौधरी यांच्यासह सचिव रमेश माळी, कॅशीयर कैला शिंदे, संजय पाटील, कनिष्‍ठ लिपीक अरूण सुर्वे, सोमनाथ पाटील, सुधाकर सुर्यवंशी, नामदेव चौधरी यांनी पाहणी केली असता

या दुकानांच्या मालकांवर गुन्हा दाखल
१. दुकान नं.१९ गजानन ट्रेडींग ॲण्ड कंपनीचे आसाराम दामु बाविस्कर,
२. डबर शटर लाईन समोरील दुकान नं.६१ नाना पाटील ॲण्ड कपंनी दुकान चंद्रकांत अशोक पाटील,
३. डबर शटर लाईन दुकान नं. ५२ जोशी ब्रदर्स हबीब खान समशेर खान
४. दुकान क्रमांक ५१ जोशी ब्रदर्स सदाशिव वेडु जोशी आणि
५. उत्तर लाई दुकान नंबर ४३ या दुकानाचे हाजी रफिक इसा बागवान

यांच्यावर कारवाई केली असून त्यांच्या विरोधात भाजीपाला विभागाचे विभाग प्रमुख वासुदेव सोनु पाटील यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई करतांना एमआयडीसी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक रणजित शिरसाठ, स.फौ. अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, रामकृष्ण पाटील, कृष्णा पाटील, श्रीकांत बदर, राजेंद्र ठाकुर, चेतन सोनवणे यांची उपस्थिती.

 

जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content