जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील शिरसोली शिवारातील एका घराला अज्ञातांनी भरदिवसा आग लावून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यात संसारपयोगी साहित्यांसह कापसू, तूर आदी वस्तू जळाल्याने २ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, गणेश पुंडलिक ठाकरे रा. वाल्मिक नगर जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहेत. शिरसोली येथे त्यांची शेती असून शेताच्या बाजूलाच राहण्यासाठी घर आहे. त्याठिकाणी गणेश ठाकरे यांचे आई वडील राहतात. गणेश ठाकरे यांचे भाऊ यांचे १७ मार्च रोजी निधन झाले. त्यानिमित्ताने आई वडील हे जळगावात आले होते. शिरसोली येथील घर बंद होते. यादरम्यान २३ मार्च रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास रोजी अज्ञात व्यक्तींनी शिरसोली येथील शेतालगत असलेल्या घर पेटवून दिले. ठाकरे यांच्या शेतालगत असलेल्या शेजारच्या शेतकऱ्याने ही घटना फोनवरुन गणेश ठाकरे यांना कळविली. त्यानुसार ठाकरे यांनी तत्काळ शिरसोली गाठले व आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत आगीत घरातील १ लाख 10 हजार रुपये किंमतीचा १४ क्विंटल कापूस, १० हजारांची २ क्विंटल तुर, २० हजारांची पाण्याची मोटार व संसारपयोगी साहित्य असे २ लाखांचे साहित्य आगीत खाक झाले. याप्रकरणी गणेश ठाकरे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलिसात अज्ञातांविरोधात जाळून नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील हे करीत आहेत.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.