शतपावली करणाऱ्या वृध्दाला दुचाकीची धडक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मेहरूण तलाव परिसरात शतपावली करणाऱ्या ५८ वर्षीय सेवानिवृत्त व्यक्तीला भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने मागून धडक देवून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रविवारी १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील नेहरु नगरात राहणारे हिरामण हरीभाऊ चव्हाण (वय-५८) हे सेवानिवृत्त कर्मचारी आहे. ते शनिवारी ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० वाजता ते शहरातील मेहरुण तलाव परिसरात शतपावली करणसाठी पायी जात होते. त्यावेळी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत जाणार्‍या दुचाकीस्वाराने जोरात धडक दिली. या अपघातात चव्हाण हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. अपघात घडल्यानंतर अज्ञात दुचाकीधारक दुचाकी घेवून पसार झाला आहे. याप्रकरणी रविवारी १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता अज्ञात दुचाकी धारकावर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक सचिन पाटील करीत आहे.

Protected Content