Breaking : दुकानात घुसून पावणे सात लाखांची रोकड लांबविली !

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळासमोरील शॉपींग कॉम्प्लेक्स येथील व्यापाऱ्याच्या दुकानात घुसून पावणे सात लाखांची रोकड असलेली पिशवी चोरून नेल्याची खळबळजनक घटना सोमवारी घडली आहे. याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समोर असलेल्या शॉपींग कॉम्प्लेक्स येथे अनिल कुमार ॲण्ड हेमराज कंपनी नावाने किरणा दुकान आहे. हे दुकान गुंजन डेडीया या व्यापाऱ्याच्या मालकीचे आहे. नेहमीप्रमाणे सोमवारी गुंजन डेडीया हे सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास किरणा दुकान उघडण्यासाठी गेले. त्यानी बाजूचे शटर उघडून पैशांची पिशवी आत ठेवली आणि समोरी शटर उघडण्यासाठी गेले. तेवढयात अज्ञात दोन चोरट्यांनी दुकानात शिरून दुकानात ठेवलेली पैशांची पिशवी घेवून दुचाकीने पसार झाले. हा प्रकार नजीकच्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे. घटनेची माहिती मिळताच हाकेवर असलेल्या धरणगाव पोलीस ठाण्याचे चोपडा उपविभागीय अधिकारी कृषिकेश रावले,पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्यासह पोलीस कर्मचारी व अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेवून माहिती घेतली. यात सीसीटीव्हीचे फुटेज तपासले असतां दुचाकीसह चोरटा कैद झाला आहे. दरम्यान, ओळखीच्या किंवा टिप दिल्यावरून ही रोकड लांबविली असावी असा अंदाज पोलीसांकडून वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक चोरट्यांच्या तपासात वेगवेगळ्या भागात गेले आहे.याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टीप : सीसीटीव्ही आणि व्हिडीओ संदर्भातील बातमी याच लिंकवर लवकरच अपडेट करत आहोत…

Protected Content