Home Cities जळगाव रायपूर जि. प. शाळेत शाडू मातीपासून गणपती मूर्ती निर्मिती कार्यशाळा उत्साहात

रायपूर जि. प. शाळेत शाडू मातीपासून गणपती मूर्ती निर्मिती कार्यशाळा उत्साहात

0
1


रायपूर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनाचा सकारात्मक संदेश देण्यासाठी रायपूर येथील जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळेत विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणपती मूर्ती निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष स्वतःच्या हाताने शाडू मातीपासून बाप्पाची आकर्षक मूर्ती तयार करण्याचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात आले, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण रक्षणाची जाणीव निर्माण होण्यास मदत झाली आहे.

या कार्यशाळेत मार्गदर्शक गजेंद्र परदेशी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना शाडू मातीपासून गणेशमूर्ती कशी बनवावी, याचे सखोल व रंजक पद्धतीने मार्गदर्शन केले. मूर्ती तयार करण्याची सोपी पद्धत, मातीचा योग्य वापर, आकार देण्याची कला आणि पर्यावरणपूरक सण साजरे करण्याचे महत्त्व त्यांनी विशद केले. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (PoP) मूर्तींमुळे नद्या व जलाशयांमध्ये होणारे घातक जलप्रदूषण टाळण्यासाठी प्रत्येक घरात शाडू मातीच्याच मूर्तींची स्थापना का आवश्यक आहे, हे विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले. विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत अत्यंत उत्साहाने सहभाग नोंदवत स्वतःच्या हाताने बाप्पाची मूर्ती घडवण्याचा अविस्मरणीय अनुभव घेतला.

सदर स्तुत्य उपक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद केंद्र शाळा रायपूरच्या मुख्याध्यापिका सौ. चित्रलेखा किशोर वायकोळे यांच्या संकल्पनेतून व पुढाकाराने पार पडले. ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षिका व कर्मचाऱ्यांनी मोलाचे परिश्रम घेतले. यामध्ये सौ. रत्नप्रभा रामकृष्ण वाणी, सौ. रोहिणी सुधाकर सोनवणे, सौ. वंदना सचिनदेव सुर्यवंशी, चंद्रलेखा सोपान पाटील, मोनिका ज्ञानदेव पाटील, ज्योत्स्ना भानुदास साळुंखे, प्रमोदिनी देवराम सनेर, स्वाती प्रकाश पाटील, संगीता रामकृष्ण कोल्हे, प्रियंका संपत दातीर, आम्रपाली बळवंत राव मंडपे, अश्विनी तुकाराम गजभारे आणि पुनम विजयसिंह परदेशी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


Protected Content

Play sound