एमआयडीसीत लागलेली आग आटोक्यात (व्हिडीओ)

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एमआयडीसी परिसरातील लोकमत कार्यालयाच्या मागे असलेल्या मोकळ्या जागेवरील कोरड्या गवताला गुरूवारी २४ मार्च रोजी दुपारी १२ वाजता अचानक आग लागली. महापालिकेच्या अग्निशमन बंबाद्वारे ही आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे.

 

सविस्तर माहिती अशी की, एमआयडीसी परिसरातील लोकमत कार्यालयाच्या मागे मोकळ्या जागेतील पटांगणात असलेल्या कोरड्या गवताला गुरूवारी २४ मार्च रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. आग लागल्याची माहिती जळगाव महापलिकेच्या अग्निशमन विभागाला समजल्यानंतर एक अग्निशमन बंब तातडीने रवाना झाला. बंब घटनास्थळी पोहचल्यानंतर काही मिनीटाच्या आत आग विझविण्यात पथकाला यश आले आहे. या आगीत काहीही आर्थीक नुकसान झालेले नाही परंतू या पटांगणातील कोरडे गावतासह झाडेझुडपे जळून खाक झाली आहे. लागलेली आग विझविण्यासाठी चालक वसंत न्हावी, भगवान पाटील, रविंद्र बोरसे, पुंडलिक सोनवणे आणि नितीन बारी यांनी घटनास्थळी धाव घेवून विशेष प्रयत्न केले.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!