मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार

जळगाव शहरातील के.सी.पार्क परिसरातील घटना

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून दहावीत शिकत असलेल्या एका १५ वर्षीय मुलाला सोबत शिकत असलेल्या सहा अल्पवयीन मुलांनी बळजबरी रिक्षात बसवून के.सी.पार्क परिसरातील एका भागात नेवूनव बेदम मारहाण करत कोयत्याने वार करून जखमी केल्याची घटना बुधवारी ४ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील एका गावात राहणारा १५ वर्षीय मुलगा हा दहावीत शिकतो. त्याने अतिरीक्त खासगी क्लासेस लावलेले आहे. त्याच्या सोबत देखील त्याच्या ओळखीचे मुलं देखील सोबत शिकवणीसाठी जातात . क्लासमध्ये शिकत असतांना मुलीवर सोबत प्रेमसंबंध असल्याचा संशयावरून १५ वर्षीय मुलाला गुरूवारी ४ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास त्यांच्या खासगी क्लासमध्ये शिकत असलेल्या मुलांनी त्याला बळजबरी रिक्षात बसून जळगाव शहरातील के.सी.पार्क परिसरातील एका ठिकाणी नेवून सहा जणांनी बेदम मारहाण केली. यातील एकाने कोयत्याने वार करून त्याच्या हाताला दुखापत केली. त्यानंतर सर्व पसार झाले. त्याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी पिडीत मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव शहर पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या सहा अल्पवयीन मुलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार करीत आहे.

Protected Content