सावदा येथील डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल येथे शपथविधी

सावदा -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मेडियम स्कूल, सावदा येथे शाळेचे शिस्तीचे नियोजन करणे, विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांना देखील येणार्‍या अडचणी सोडवण्यासाठी विद्यार्थी व शिक्षक यांची दरवर्षीप्रमाणे लोकशाही पद्धतीने निवडणूक घेण्यात येते आणि त्यातून विद्यार्थी प्रतिनिधी आणि शिक्षक प्रतिनिधी अशी नेमणूक पदाधिकारी म्हणून केली जाते आणि शाळेची पूर्णपणे शिस्तीची जबाबदारी पदाधिकार्‍यांवर सोपविली जाते. निवडून आलेल्या पदाधिकार्‍यांना पदक देऊन सन्मानीत करण्यात येते व त्यांच्याकडून शपथविधी ग्रहण केला जातो. हा शपथविधी दि.०४/०९/२०२३ सोमवार यादिवशी घेण्यात आला.

या कार्यक्रमासाठी शाळेच्या प्राचार्या भारती महाजन यांनी हेड शिक्षक म्हणून स्वप्नील बेलोसे आणि हेड शिक्षिका म्हणून मीनी प्रकाश यांना पदक (बॅच) देऊन त्यांच्याकडून न्यायपूर्वक शपतविधी वदवून घेतला. त्यानंतर शाळेची हेड गर्ल्स टिना चौधरी आणि हेड बाँय प्रथमेश लोहार यांनाही पदक (बॅच) देवून शपथविधी घेतला. त्यानंतर हाऊसनुसार विद्यार्थी पदाधिकार्‍यांकडून शपथविधी घेतला गेला. एकूणच विद्यार्थ्यांना शाळेतील शिस्तीचे महत्त्व समजावे हा यामागचा हेतू असतो. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका रेणुका मॅडम व हेड शिक्षक स्वप्नील सर यांनी केले. अतिशय आनंदी वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला.

Protected Content