पाचोरा येथील गो.से हायस्कुलात क्रांतीदिन उत्साहात

pachora 1

 

पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील पी.टी.सी. संचालित श्री गो.से हायस्कूलमध्ये आज दि. 9 ऑगस्ट रोजी क्रांतीदिन साजरा करण्यात आला. यामध्ये सकाळ सत्रातील सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.

अधिक माहिती अशी की, यात विद्यार्थ्यांनी क्रांतिकारकांच्या वेशभुषेचे महत्त्व थोडक्यात पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. याचवेळी, क्रीडांगणावर पाऊस सुरू असल्याने विध्यार्थ्यांनी प्रत्येक वर्गात जाऊन देशभक्तीपर घोषणा दिल्या. या विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, भगतसिंग, राजगुरू, झाशीची राणी अशी वेशभुषा परिधान केली होती. यामुळे शाळेत काहीवेळ देशभक्तीपर वातावरण निर्माण झाले होते. शाळेतील कलादालनात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात संगीत साथ सागर थोरात, रुपेश पाटील यांनी देऊन या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सकाळ सत्राचे एन.आर.ठाकरे तर प्रमुख अंजली गोहिल, वैशाली तुसे, प्रतिभा पाटील यांनी विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली. एस.बी. पाटील, अरुण कुमावत, सुबोध कांतायने, प्रमोद पाटील, यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

यावेळी शाळेतील भेट प्रसंगी गटशिक्षणाधिकारी विकास पाटील, यांनी शाळेतील सहभागीं विध्यार्थ्यांचे कौतुक केले. यावेळी मुख्याध्यापक एस.डी.पाटील, उपमुख्याध्यापक ए.आर. वाघ, पर्यवेक्षिका सी.एस.धुळेकर उपस्थित होते. सूत्रसंचालन व्ही.ए.तुसे यांनी तर आभार आर.बी. बोरसे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेत्तर व आदींनी परिश्रम घेतले आहे.

Protected Content