प.वि.पाटील विद्यालयात विद्यार्थ्यांनी बनविल्या राख्या

जळगाव प्रतिनिधी । शहरातील प.वि.पाटील विद्यालयात टाकाऊ वस्तूपासून सुंदर राख्या बनविण्याचा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी दुसरीच्या विद्यार्थ्यांनी अनेक आकर्षक राख्या बनविले. 

राखी एक प्रेमाचं प्रतीक राखी एक विश्वास आहे. हाच विश्वास रक्षाबंधनाच्या पूर्वसंधेला गुरुवर्य प. वि. पाटील प्राथमिक विद्यामंदिर ,जळगाव  येथे इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी दाखविला. घरी राहून विद्यार्थ्यांनी रक्षाबंधन या सणानिमित्त  टाकाऊपासून टिकाऊ कसे तयार करावे ? याचेच एक उदाहरण म्हणून सुंदर अशा राख्या तयार केल्या. या राख्यांमध्ये विद्यार्थ्यांनी स्ट्रॉ, कापूस, दोरा, लोकर, रंगीत मणी या अशा विविध सामानापासून राख्या तयार केल्या. या उपक्रमांतून विद्यार्थ्यांचे दोन उद्देश सफल झाले. एक म्हणजे घरातील निरुपयोगी वस्तूंपासून आपणही एक चांगली व उपयोगी बनवू शकतो व दुसरे म्हणजे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाला. कार्यक्रमाचे मार्गदर्शन शाळेच्या मुख्याध्यापिका  रेखा पाटील यांनी केले. आयोजन स्वाती पाटील व अशोक चौधरी यांनी केले व यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळाले.

 

Protected Content