हद्दपार गुन्हेगाराला चॉपरसह अटक; शहर पोलीसांची कारवाई

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातून दोन वर्षांसाठी हद्दपार असताना गेंदालाल मिल परिसरात लोखंडी चॉपर घेऊन फिरणाऱ्या गुन्हेगाराला शहर पोलिसांनी कारवाई करत अटक केली आहे. त्याच्याकडून लोखंडी चॉपर हस्तगत करण्यात आला असून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किरण अनिल बाविस्कर वय-२४, रा. गेंदालाल मिल, जळगाव असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. गुन्हेगार किरण बाविस्कर याला उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी २ वर्षांसाठी जिल्हा हद्दपार केले आहे. दरम्यान जिल्हातून हद्दपार असताना देखील तो जळगाव शहरात येऊन हातात लोखंडी चॉपर घेवून दहशत माजवित असल्याची गोपनिय माहिती जळगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने सोमवारी १८ मार्च रोजी दुपारी १.३० वाजता गेंदालाल मिल परिसरात कारवाई करत संशयित आरोपी किरण अनिल बाविस्कर याला अटक केली. त्याच्याकडून लोखंडी चॉपर हस्तगत केला आहे.

याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अमोल ठाकूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार बशीर तडवी, पोलीस हेडकॉन्स्टेबल भास्कर ठाकरे, पोलीस नाईक योगेश पाटील, रतन गीते यांनी केली आहे.

Protected Content