देवझिरी वनक्षेत्रातील सागवान वृक्षतोड करून वनकर्मचाऱ्यांना ठार मारण्याची धमकी देणाऱ्या अटक

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  देवझिरी वन वनक्षेत्रात वृक्षांची तोड केल्याप्रकरणी कारवाई केल्याप्रकरणी संशयित आरोपी याने कर्तव्यावर असलेल्या वन कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी फरार आरोपीस अटक करण्यात आली आहे. त्यास तीन दिवसाची वन कोठडीत ठेवण्याचे आदेश चोपडा न्यायालयाने दिले आहे.

या संदर्भात वनविभागाच्या सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, यावल वनक्षेत्राच्या कार्यक्षेत्रात असलेल्या देवझिरी वनक्षेत्र देवझीरी येथील राखीव वनखंड क्रमांक १६४ मध्ये १२ मार्च मंगळवार रोजी संशयित आरोपी कांतीलाल गुलाब पावरा (रा. खैरकुंडी पाडा) याने अवैधरित्या वनक्षेत्रात प्रवेश करीत सागवान जातीचे २५ वृक्षांची तोड करून, कर्तव्यावर असलेल्या देवझिरी वनक्षेत्रातील वनरक्षक विजय पावरा व वनसेवक रविन्द्र बारेला, संजय बारेला यांना देवझिरी वनक्षेत्राच्या कार्यालयावर येऊन शिवीगाळ व जीवे ठार मारण्याची धमकी देऊन फरार झालेल्या कांतीलाल गुलाब पावरा यास यावल वनक्षेत्राचे उप वनसंरक्षक जमीर शेख यांच्या व सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हडपे यांच्या मार्गदर्शनाखाली देवझीरी वनपरिक्षेत्र अधिकारी जी. आर. बडगुजर, हंडया कुंडया वनक्षेत्राचे वनपाल स्वप्नील रणदिवे यांनी गुप्त माहितीच्या आधारावर खैरकुंडी परिसरात सापळा रचुन अटक करण्यात आली आहे. सदर आरोपीस चोपडा न्यायालयात हजर केले असता त्यास न्यायालयाने २० मार्च बुधवारपर्यंत वनकोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे .

Protected Content