नदीपात्रात तरुण शेतकऱ्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू ! परिसरात हळहळ

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील अंजाळे गावातील मोरनदी पात्रात शेळगाव बॅरेजचे मोठ्या प्रमाणावर बॅक वॉटरचे पाणी तोल जाऊन पडल्याने तरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवार 18 मार्च रोजी घडली आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

या संदर्भात मिळालेली माहीती अशी की, अंजाळे तालुका यावल येथील राहणारा सुनिल दिलीप बादशाह (वय-३०) हा १८ मार्च रोजी गावातील परिसरात असलेल्या नदीपात्र परिसरात गुरे चराईसाठी गेला असता म्हैसीला नदीपात्रातुन बाहेर काढत असतांना त्याचाच पाय घसरल्याने तोल जाऊन पाण्यात पडल्याने त्याचा मृत्यू झाला.

तरुण पाण्यात पडल्याचे लक्षात आल्यानंतर परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन त्याला बाहेर काढले व यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले.

याबाबत यावल पोलीस ठाण्यात भरत बादशहा यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार संदीप सूर्यवंशी,किशोर परदेशी करीत आहे. मयत याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, तीन वर्षाचा मुलगा,सात महिन्याची मुलगी आहे. विवाहित तरुणाच्या मृत्युमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे .

Protected Content