चाकू हल्ल्यातील एका संशयितास अटक

chaku halla

जळगाव प्रतिनिधी । किरकोळ कारणावरून मारहाण करत चाकू हल्ला केल्याची घटना दोन महिन्यापुर्वी घडली होती. याप्रकरणातील सहा संशयित आरोपींपैकी एकास अटक करण्यात एमआयडीसी पोलीसांना यश आले आहे.

याबाबत माहिती अशी की, फिर्यादी किरण शंकर खर्चे रा. सुप्रिम कॉलनी याला 17 मे 2019 रोजी संशयित आरोपी निलेश उर्फ लोकश युवराज सपकाळे, रूपेश मनोहर सोनार, अनिल घुले, राधे शिरसाट, अमोल कोळी, विक्की पाटील यांनी फॉर्च्यूनर गाडी क्रमांक एमएच 19 सीए 1 मध्ये येऊन पोटात चाकू मारून गंभीर जखमी करून जिवेठार मारण्याचा प्रयत्न केला. याबाबत एमआयडीसी पोलीसात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा घडल्यापासून वरील सर्व आरोपी फरार होते. यातील संशयित आरोपी रूपेश सोनार रा. हनुमान नगर, अयोध्यानगर हा 13 जुलै रोजी इदगाव येथे येणार असल्याची माहिती विभागीय पोलीस अधिकारी निलाभ रोहम यांनी पो.नि.रणजित शिरसाट यांना दिली. त्यानुसार पोउनि विशाल वाठोरे, पोना सचिन मुंढे, पोकॉ गोविंदा पाटील, किशोर पाटील, सतीष गर्जे यांनी सापळा रचून संशयितास अटक केली आहे.

Protected Content