पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने सेवा सप्ताह

 

जळगाव, प्रतिनिधी ।  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा  वाढदिवस संपूर्ण देशभरात सेवा सप्ताह म्हणून साजरा करण्यात येत असून याच अनुषंगाने भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगराच्या वतीने विविध समाजउपयोगी व जनहितार्थ लोककल्याणकारी उपक्रमांचे आयोजन करून ७०वा वाढदिवस साजरा करण्यात येत आहे.

या सेवा सप्ताहाची सुरुवात सकाळी कोविड सेंटर शासकीय पॉलीटेकनिकल व बहिणाबाई येथे सेवाकार्य करणारे कोरोना योद्धे यांचा सत्कार करून झाला. यात डॉ.संजय पाटील, डॉ.विजय घोलप, तसेच सॅनीटायीज (फवारणी) करणारे गोविंदा तांबे व जलसेवा देणारे मनोज पवार व प्रशांत बऱ्हाडे, एकनाथ पाटील, कमलाबाई पाटील या कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांचा समावेश आहे.

हा सत्कार जिल्हा ग्रामीण अध्यक्ष आमदार सुरेश भोळे , शहराध्यक्ष दिपक सूर्यवंशी, महापौर भारती सोनवणे, माजी आमदार .गुरुमुख जगवानी, मनपा सभागृह नेते ललीत कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आला. कोविड सेंटर येथील ५०० कोरोना रुग्णांना चिकू व डाळिंब वाटप करून वृक्षारोपण करण्यात आले.

यानंतर भाजपा कार्यालय वसंत स्मृती येथे भाजपा युवामोर्चाच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर व दिव्यांग बांधवांना साहित्य वाटप करण्यात आले. सायंकाळी साईबाबा मंदिर रिंगरोड येथे गरीब व गरजू बांधवांना चष्मे वाटप करण्यात आले. तसेच महानगरातील ९ मंडळांमध्ये विविध जनकल्याणकारी व समाज उपयोगी उपक्रम राबवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७०वा वाढदिवस सेवा सप्ताहाच्या माध्यमातून साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाप्रसंगी माजी महापौर सदाशिवराव ढेकळे, स्थायी .सभापती अॅड.शुचिता हाडा, जेष्ठ नगरसेवक कैलास सोनवणे, उपगटनेते राजेंद्र घुगे पाटील, जिल्हापदाधिकारी विशाल त्रिपाठी, डॉ.राधेशाम चौधरी, महेश जोशी, नितीन इंगळे, सुनील माळी, अमित भाटीया, राहुल वाघ, मनोज भांडारकर, अक्षय चौधरी, सप्ताह प्रमुख जितेंद्र मराठे, महिला आघाडी अध्यक्ष दिप्ती चिरमाडे, युवामोर्चा अध्यक्ष आनंद सपकाळे, मंडल अध्यक्ष अजित राणे, प्रवीण कोल्हे, विनोद मराठे, आघाडी अध्यक्ष दिलीप बाविस्कर, प्रवीण जाधव, गुड्डू भाई, जयेश भावसार, लता बाविस्कर, नगरसेवक मनोज आहुजा, धीरज सोनवणे, प्रा.सचिन पाटील, पर्वता भिल, सरिता नेरकर, गायत्री राणे, उज्वला बेंडाळे, अतुल बारी, संजय विसपुते, युवा मोर्चा चे गितांजली ठाकरे, जितेंद्र चौथे, अक्षय जेजुरकर, महेश पाटील, मिलिंद चौधरी, सचिन बाविस्कर, राहुल मिस्तरी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दि. १४ ते २० सप्टेंबर भाजप महानगरातील ९ मंडळांमध्ये सेवा सप्ताह राबवला जाणार असल्याचे जिल्ह सेवा सप्ताह प्रमुख जितेंद्र मराठे यांनी सांगितले.

Protected Content