राष्ट्रवादीचा शिवसेनेला अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव

shivsena ncp logo

 

मुंबई (वृत्तसंस्था) पाठिंब्याचे पत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्याची शिवसेनेची मागणी फेटाळून राज्यपालांनी तिसऱ्या क्रमांकावरील राष्ट्रवादी काँग्रेसला सरकार स्थापन करण्याची संधी दिली आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीने शिवसेनेसमोर अडीच-अडीच मुख्यमंत्री पद वर्ष वाटून घेण्याचा प्रस्ताव ठेवला असल्याचे कळते.

 

भाजपा आणि शिवसेना सत्ता स्थापन करण्यात असमर्थ ठरल्यानंतर राज्यपालांनी तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिलं असून रात्री ८.३० वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक सुरु असून त्यात काँग्रेसने बाहेरुन पाठिंबा न देता थेट सत्तेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर राष्ट्रवादीने शिवसेनेसमोर अडीच-अडीच वर्ष वाटून घेण्याचा प्रस्ताव दिला आहे. दुसरीकडे शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेही रिट्रीट हॉटेलमध्ये आमदारांशी चर्चा करत आहेत. त्यामुळे आता नेमकं काय होते? याकडेच सर्वांचे लक्ष लागून आहे.

Protected Content