आर्थिक संकटावरून लक्ष विचलीत करण्यासाठीच चांद्रयानचा गाजावाजा : ममता बॅनर्जी

EDxcOhQUcAIdAMh

 

कोलकाता (वृत्तसंस्था) देशातील आर्थिक मंदीच्या स्थितीवरुन जनतेचे लक्ष हटवण्यासाठी मोदी सरकार चांद्रयान-२चा गाजावाजा करीत असल्याचा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. दरम्यान, भारताच्या महत्वाकांक्षी मोहिमेतील चांद्रयान-२ यान पुढील काही तासांमध्ये चंद्रावर उतरणार आहे.

 

चांद्रयान-२ विक्रम लँडर चांद्रभूमीवर उतरण्यास अवघे काही तास बाकी असताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी चांद्रयान-२ मोहिमेवरून केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. त्यावरून लक्ष हटविण्यासाठी चांद्रयान-२ मोहिमेचा वापर केला जात आहे, अशी टीका ममता बॅनर्जी यांनी केली आहे. ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी कोलकात्यातील राज्य विधानसभेत बोलताना म्हटले की, केंद्रातील मोदी सरकार चांद्रयान-२चा प्रचार अशा पद्धतीने करीत आहे, की यापूर्वी भारताने कधीही कुठल्याही अंतराळ मोहिमेचे नेतृत्व केलेलेच नाही. उलट देशात निर्माण झालेल्या आर्थिक संकटाला लपवण्यासाठी केंद्र सरकार चांद्रयान-२ मोहिमेचा वापर करत असल्याचा आरोपही यावेळी ममतांनी केला.

Protected Content