जलसंधारण कामांना मान्यता मिळावी : आ. अनिल पाटील

अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील बंधार्‍यांसह अन्य जलसंधारणाच्या कामांना मान्यता मिळावी अशी मागणी आमदार अनिल भाईदास पाटील यांनी मृदू व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्याकडे केली आहे.

अमळनेर मतदार संघातील बंधार्‍याच्या कामांना मान्यता देण्याची मागणी आमदार अनिल पाटील यांनी मुंबई येथे मृदू व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्याकडे केली आहे. याच्या अंतर्गत वेळी कुर्‍हे बुद्रुक, कुर्‍हे खुर्द, रामेश्‍वर, पारोळा तालुक्यातील शेळावे बुद्रुक, शेळावे खुर्द, महाळपूर १, महाळपूर २, पुनगाव १, पुनगाव २, कोळपिंप्री, बहादरपूर १, बहादरपूर २, धाबे, दगडी सबगव्हाण, इंधवे १, इंधवे २, आंबापिंप्री १, आंबापिंप्री २, आंबापिंप्री ३, आंबापिंप्री ४, आंबापिंप्री ५ या कामांना मान्यता देणे तसेच अमळनेर तालुक्यातील पांझरा नदीवर असलेल्या ब्राम्हणे तर शिंदखेडा तालुक्यातील बेटावद दरम्यान असलेला बंधार्‍याच्या दूरुस्तीसाठी निधी देण्याची मागणी केली. शहापूर येथे नवीन बंधार्‍याच्या कामासाठी आवश्यक निधी उपलब्ध व्हावा, यासाठी आमदार अनिल पाटील यांनी मंत्री गडाख यांना पत्र दिले आहे. या वेळी जलसंधारण विभागाचे अप्पर मुख्य सचिव नंदकुमार जैन उपस्थित होते.

Protected Content