यावल तालुक्यात पाच दिवसांच्या गणरायाला उत्साहात निरोप (व्हिडीओ)

yaval miravnuk

यावल, प्रतिनिधी | तालुक्यातील ३५ तर शहरातील १८ सार्वजानिक मंडळांनी आणि एका खाजगी गणेशाला आज (दि.६) अत्यंत उत्साहाच्या वातावरणात निरोप देण्यात आला. यावेळी शहरातील प्रमुख मार्गाने निघालेल्या या विसर्जन मिरवणुकीत मंडळांचे कार्यकर्ते व भक्त ढोल-ताशे व झांजच्या सुमधुर तालावर भक्तीमय वातावरणात बेधुंद होवुन नाचत होते.

 

शहरातील महाजन गल्ली ते म्हसोबा मंदीर चौक, गवत बाजार चौक, काजीपुरा मस्जीद, जुने भाजीबाजार चौक बारी वाडा, चावडी चौक, डांगपुरा मस्जीद कोर्ट रोड या प्रमुख मार्गाने आज दुपारपासुन विसर्जन मिरवणुक काढण्यात आली होती, त्यामुळे सर्वत्र वातावरण भक्तीमय झाले होते. मेन रोडच्या मार्गाच्या कडेला आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे दर्शन व निरोप देण्यासाठी भक्तांनी व विशेष महिलांनी मोठी गर्दी केली होती.

या सार्वजनीक विसर्जन मिरवणुकीसाठी पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे यांच्यासह एकुण १२ पोलीस उपनिरीक्षक, १३८ पोलीस कर्मचारी ८५ गृहरक्षक दलाचे कर्मचारी, दोन आरसीएफ, दोन स्टायकींग फोर्स, एक एसआरपीएफची पालटुन असा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या या विसर्जन मिरवणुकीत शांतता व सलोखा राखण्यासाठी शांतता समितीचे जेष्ठ सदस्य चंद्रकांत गंगाधर देशमुख, हाजी शब्बीर खान, हाजी ईकबाल खान, प्रमोद नेमाडे, बाळु फेगडे, माजी नगरसेवक उमेश फेगडे, विजय सराफ, किशोर कुलकर्णी, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर सोनवणे, माजी नगराध्यक्ष व नगरसेवक अतुल पाटील, माजी नगराध्यक्ष शशांक देशपांडे, नगरसेवक प्रा.मुकेश येवले, उपनगराध्यक्ष राकेश कोलते, शिवसेनेचे मुन्ना पाटील, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख कडु पाटील आदी प्रयत्नशील आहेत.

 

 

Protected Content