शालेय पोषण आहार तपासणीसाठी जिल्हा व तालुकास्तरीय भरारी पथक स्थापन

notice to the jalgaon zp ceo 20180588764

जळगाव, प्रतिनिधी | शालेय पोषण आहारासंदर्भात जिल्हा परिषद सदस्यांकडून वारंवार येणाऱ्या तक्रारी तसेच पुरवठ्यात होणारे घोळ यासारखे प्रकार घडत असतात. हे प्रकार रोखून योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने भरारी पथक नियुक्‍त करण्याचे निर्देश होते. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आज जिल्हास्तर व तालुकास्तरावर भरारी पथक नेमले आहेत.

विद्यार्थ्यांना आहाराचे कमी वाटप करणे किंवा निकृष्ट प्रतीचा आहार वाटप करणे, तांदूळ व इतर माल याचा शाळेमध्ये उपलब्ध प्रत्यक्ष साठा व नोंदवहीमधील नोंदी यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आढळणे, तांदूळ व इतर मालाची बाजारामध्ये विक्री करणे, पुरवठादारामार्फत निकृष्ट माल शाळांना पुरवठा करणे अशा तक्रारींचा यांत समावेश आहे़. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना निकृष्ट दर्जाच्या धान्याचा पुरवठा करण्यात येतो, अशा तक्रारी जि. प. सदस्य पल्लवी सावकारे यांनी केल्या होत्या. शालेय पोषण आहार योजनेतंर्गत विद्यार्थ्यांना चांगला व पुरेसा आहार देवून योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरावर भरारी पथक स्थापन करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. जिल्ह्यात पोषण आहाराचे पथक नेमण्यास जिल्हा परिषद तसेच शिक्षण विभागाकडून भरारी पथक स्थापन करण्यासाठी विलंब झाला आहे. हे पथक नेमण्याचे काम आज सोमवार २६ ऑगस्ट रोजी जि.प. प्रशासनाने केले. सदरचे शालेय पोषण आहार भरारी पथकाचे नियंत्रण अधिकारी म्हणून मुख्य कार्यकारी आहेत. सीईओंच्या नियंत्रणाखाली पथक शाळांना भेटी देवून पोषण आहाराच्या मालाची तपासणी करतील. विद्यार्थ्यांना आहाराचे कमी वाटप करणे किंवा निकृष्ट प्रतीचा आहार वाटप करणे, तांदूळ व इतर माल याचा शाळेमध्ये उपलब्ध प्रत्यक्ष साठा व नोंदवहीमधील नोंदी यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आढळणे, तांदूळ व इतर मालाची बाजारामध्ये विक्री करणे, पुरवठादारामार्फत निकृष्ट माल शाळांना पुरवठा करणे अशा तक्रारींचा यांत समावेश आहे़.जळगाव जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना निकृष्ट दर्जाच्या धान्याचा पुरवठा करण्यात येतो, अशा तक्रारी जि. प. सदस्य पल्लवी सावकारे यांनी केल्या होत्या.  जिल्हा व तालुकास्तरवर पथक : जि.प. प्रशासनाने जिल्हास्तर आणि तालुकास्तरावर पाच सदस्यीय भरारी पथक नेमण्यात आले आहेत. यामध्ये जिल्हास्तरावरील पथकाचे प्रमुख म्हणून ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आहे. तर सदस्य म्हणून माध्यमिक उपशिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षण विस्तार अधिकारी, माध्यमिक शिक्षण विस्तार अधिकारी व शालेय पोषण आहाराचे लेखाधिकारी आहेत. तर तालुकास्तरावर पथक प्रमुख म्हणून स्थानिक पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी असून, पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी, पं.स. शालेय पोषण आहार अधिक्षक, पं.स. शिक्षण विस्तार अधिकारी आणि केंद्र प्रमुख सदस्य आहेत.

Protected Content