पाणीपट्टी रक्कम निर्लेखन करण्यावरून स्थायीत खडाजंगी (व्हिडिओ)

WhatsApp Image 2019 12 20 at 3.13.33 PM

जळगाव, प्रातिनिधी | मनपा स्थायी समितीच्या आजच्या बैठकीत पाणीपट्टी रक्कम निर्लेखन करण्यावरून शिवसेना व भाजपा सदस्यांमध्ये खडाजंगी झाली. ही सभा सभापती अॅड. शुचिता हाडा यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

मागील सभेत तहकूब असलेला पाणीपट्टी निर्लेखित करण्याचा ठराव पुन्हा चर्चेसाठी प्रशासनाने सभृहात आणल्याने शिवसेनेचे नितीन लढ्ढा यांनी नाराजी व्यक्त केली.  याला उत्तर देतांना राजेंद्र घुगे पाटील संबधितांना कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी पाणीपट्टीची बिले दिली आहेत व ती त्यांनी स्वीकारली असतांना ती का माफ करण्यात यावीत असा प्रश्न उपस्थित केला. यात प्रशासनाची चूक आहे की प्रस्ताव चुकीचा आहे असा प्रश्न नितीन लढ्ढा यांनी केला. यावर राजेंद्र घुगे पाटील व नितीन लढ्ढा यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. यात सदाशिव ढेकळे यांनी मध्यस्थी करून वाद मिटविला व विषय पुन्हा तहकूब ठेवण्यात आला. नितीन लढ्ढा यांनी ट्रान्सपोर्ट नगरची जागा विकसित करून तेथे लग्झरी बस स्थानकास उभारल्यास मुंबई, पुणे, नागपूर येथे जाणाऱ्या लग्झरी बसेस यांना शहरात येण्याची आवश्यकता राहणार नसल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

Protected Content