महामार्ग चौपदरीकरणात अडथळ्यांची शर्यत : दीपककुमार गुप्ता (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी  | शहरातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण होत असतांना याच्या दोन्ही बाजूंनी उपलब्ध असणारी जागा लक्षात घेऊनच सेंटर लाईन प्रमाण मानावी अशी मागणी आज सामाजिक कार्यकर्त्यांनी केली. दीपक कुमार गुप्ता, शिवराम पाटील, ईश्‍वर मोरे, अनिल नाटेकर आणि त्यांच्या सहकार्‍यांनी थेट हायवेवरच पत्रकार परिषद घेऊन ही बाब किती आवश्यक आहे याची माहिती दिली.

 

शहरातून  जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग उडडाणपुल, भुयारी मार्ग ई नवीन बांधकामे करून विकसित करणेची कामे राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणामार्फत कामे सुरु आहेत. या कामांमध्ये काही ठिकाणी अडचणी येत असून न्हाईचे सल्लगार हे योग्य सल्ला देत नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी केला.  आकाशवाणी चौकात, ईच्छादेवी चौकात सुरू असलेल्या Junction Development च्या ठिकाणी महामार्गाची सेंटर लाईन ही चुकीच्या पध्दतीने मोजमाप केली असल्याचे दिसून आले. आकाशवाणी चौकात महानगरपालिकेच्या नगररचना विभागाने विकास नकाशात दर्शविल्यानुसार 60 मीटर महामार्गाची रूंदी आहे. मात्र प्रत्यक्षात बऱ्याच ठिकाणी सदरची रूंदी उपलब्ध होत नाही. तसेच या रूंदीत सेंटर लाईन नुसार जुना महामार्ग दोनही बाजूस समान रुंदीचा असणे आवश्यक असतांना तो प्रत्यक्षात नाही.  सेंटर लाईन नुसार बांधकाम जागेवर न झाल्यास समांतर रस्ते तयार करण्यास अडचण निर्माण होईल ही  तांत्रिकदृष्टया योग्य नसल्याने व यापूर्वी न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्र, न्यायालयाने दिलेले नि-(मे.उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ – औरंगाबाद याचिका क्रं. 1788/2010) यांचेशी विसंगत असल्याने या प्रकरणी मे.न्यायालयाचा अवमान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आकाशवाणी चौकात चुकीच्या ठिकाणी बस थांबा बांधकाम केलेले आहे त्यामुळे सदर बांधकाम हे चुकीच्या जागेवर झालेले असल्याचा दावा करण्यात आला आहे. इच्छादेवी चौकाच्या विरुद्ध बाजूस जास्त जागा शिल्लक राहिली असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे. संबधित विभागाची त्रयस्थ यंत्रणेमार्फत चौकशी करून चुकीच्या कामामुळे वाया गेलेला निधी वसूल करण्यात यावा अशी मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/389914832630251

 

Protected Content