प्रसिध्द फिजिशियन डॉ. विनोद बाविस्कर यांची सेवा डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महा. व रूग्णालयात उपलब्ध

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालय येथे आता जळगावचे प्रसिध्द फिजिशियन डॉ. विनोद बाविस्कर यांची सेवा रोज सकाळी ९ ते ५ उपलब्ध आहे.

डॉ. विनोद बाविस्कर हयांनी जे जे हॉस्पीटल मुबंई येथून एम बी बी एस आणि एम डी उर्तीण केले आहे. १९८६ पासून सामान्य रूग्णालय जळगाव येथे २००५ पर्यंत जवळपास २० वर्ष फिजिशियन सिव्हील सर्जन कॅडल म्हणून त्यांनी सेवा बजावली. याकाळात अनेक मोठे राजकारणी, तसेच साथीच्या आजाराचे रूग्ण, याचप्रमाणे रेबीज,विषप्राशन विषबाधा झालेले रूग्ण यांच्यावर यशस्वी उपचार केले आहे.

सामान्य रूग्णालयात अत्यावस्थ रूग्णांवर सोयीसुविधा उपलब्ध नसतांना देखिल आहे त्या साधनातच अनेकाचे जिव वाचवल्याने जिल्हयात प्रसिध्द फिजिशियन म्हणून ते नाव रूपास आले. मधुमेह, थॉयराईड, उच्चरक्‍तदाब या आजारांवर उपचारात त्यांचा हातखंडा आहे. २००५ पासून २०२० पर्यंत जवळपास १५ वर्ष त्यांनी डॉ सुभाष चौधरी यांच्यासोबत देखिल काम केले आहे. २ वर्ष गोल्डसिटी रूग्णालयात देखिल सेवा बजावली आहे. डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय रूग्णालयात ते दरोरोज ९ ते ५ सेवा देणार असून जळगाव जिल्हयातील रूग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन रूग्णालय प्रशासनाने केले आहे.

Protected Content