जळगाव येथे डॉ. मोईज देशपांडे यांचा खान्देश गौरव पुरस्काराने सन्मानित

जळगाव प्रतिनिधी | आयुष इन्टरनॅशनल मेडिकल असोसिएशनतर्फे डॉ. मोईज देशपांडे यांना खान्देश गौरव पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले.

जळगावातील हॉटेल सिल्वर पॅलेस येथे झालेल्या कार्यक्रमाला पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, महापौर जयश्री महाजन, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. मोईज देशपांडे हे बीएएमएस असून मेहरूण परिसरात त्यांचे हॉस्पिटल आहे. परिसरातील आणि खेड्यातील लोकांना अगदी सवलाती च्या दरात येथे उपचार घेता येतात. ते रेड प्लस ब्लड बँकेचे चेअरमन ही आहेत. एका आयुष विद्यार्थ्याने संस्थेच्या माध्यमातून  पुढाकार घेऊन  ब्लड बँक सारखा समाज उपयोगी उपक्रम राबवणे हे कौतुकास्पद आहे. या ब्लड बँकेने कोरोना काळात जेव्हा जळगावात रक्त पुरवठ्याची कमतरता भासत होती तेव्हा अथक प्रयत्नांनी रक्तसाठा उपलब्ध करून दिला तसेच कोविड रुग्णांच्या उपचारासाठी लागणारा प्लाझ्मा अथक प्रयत्न करून उपलब्ध करून दिला.

Protected Content