माजी आमदार दिलीप वाघ यांची बदनामी : एकाविरूध्द गुन्हा

पाचोरा प्रतिनिधी । माजी आमदार तथा बाजार समितीचे मुख्य प्रशासक दिलीप वाघ यांची सोशल मीडीया बदनामी कारक मजकूर टाकल्याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, रणजीत अभिमन्यू पाटील हे सद्यस्थितीत कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासकपदी नेमणुकीस आहे. कृउबा मुख्य प्रशासक हे माजी आमदार दिलीप वाघ हे आहेत. सदर मार्केट कमिटीचे अखत्यारीत मार्केटचे समोरील बाजूस पाचोरा रोडला लागून सुमारे १०० गाळे आहेत. त्यापैकी बरेचसे गाळे हे बेकायदेशीर रित्या करारनामे न करता लोकांनी ताब्यात घेवून वापरत होते. सदर बाबत गाळे धारकांना आम्ही करारनामे करण्यासाठी व थकीत भाडे भरण्यासाठी गाळेधारकांना नोटिसा पाठविल्या होत्या. जवळजवळ सर्वच गाळे धारकानी नोटिसांचे पालन करून नियमानुसार करारनामा केले. मात्र या उलट पाचोरा शहरातील निळकंठ प्रल्हाद पाटील यांचे कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोराचे मुख्य प्रशासक दिलीप वाघ यांच्या बाबतीत ७० ते ८० लाख रुपये दिलीप वाघ यांनी मार्केट कमिटीचे गाळ्यांचे प्रकरणात जमा केलेले आहे. अशी फोनवर आपसात दोन लोकांमध्ये बोलणारी एक संभाषण ऑडिओ क्लिप तयार करून सदर क्लिप ही “जगा आणि जगू द्या” या व्हाट्सअप ग्रुपवर ३१ रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास प्रसारित करून माजी आमदार दिलीप वाघ यांची बदनामी केली. सोबत प्रशासक मंडळाची देखील बदनामी केली आहे. याविषयी फिर्यादी रणजीत पाटील यांना त्यांचे मित्र अभिजीत पवार यांनी कळविली. व सदर क्लिप आरोपीने यांने फिर्यादीस पाठविले म्हणून फिर्यादी यांची निळकंठ पाटील रा. पाचोरा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content