पाचोरा नगराध्यक्षांना खंडपीठाचा दिलासा

पाचोरा प्रतिनिधी । येथील लोकनियुक्त नगराध्यक्ष संजय गोहिल यांना अपात्रता प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलासा दिला आहे.

याबाबत वृत्त असे की, येथील लोकनियुक्त नगराध्यक्ष संजय गोहिल यांनी वेळेस जात प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे त्यांना जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी अपात्र घोषीत केले होते. २०१६च्या अखेरीस झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या संजय नाथालाल गोहील यांनी लोकनियुक्त नगराध्यक्षपदावर विराजमान झाले होते. मात्र त्यांच्या जात पडताळणी प्रमाणपत्राबाबत तक्रार करण्यात आली होती. या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पराभूत झालेले उमेदवारी अजय भास्कर अहिरे यांनी त्यांच्या विरूध्द जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार दाखल केली होती. यावर जिल्हाधिकार्‍यांकडे सुनावणी झाली. या प्रकरणी जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ च्या कलम ५१-१ब प्रमाणे निकाल देत संजय गोहील यांना अपात्र घोषीत केले होते.

दरम्यान, गोहिल यांनी या प्रकरणी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने त्यांच्या अपात्रतेला स्थगिती दिली आहे.

Add Comment

Protected Content