अमळनेरात सरदार वल्लभभाई पटेल चौक फलकाचे अनावरण

अमळनेर प्रतिनिधी । अमळनेर नगरपालिकेने गुर्जर समाजाच्या मागणी मान्य करत गलवाडे रस्त्यावर सरदार वल्लभभाई पटेल चौकाचे नामकरण करून फलकाचे अनावरण करण्यात आले.

नॅनो तज्ञ प्रा. डॉ.एल.ए. पाटील, नगरसेवक शाम पाटील, नगरसेवक मनोज पाटील, सेवानिवृत्त पोलीस उपायुक्त मंगलसिंग सूर्यवंशी, गुर्जर भवनचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पवार यांच्याहस्ते फलकाचे अनावरण करण्यात आले.

नगरपालिकेच्या नगराध्यक्षा पुष्पलता पाटील व माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या प्रयत्नाने मागणी मंजूर केल्याचे पत्र नगरसेवकांनी गुर्जर समाजाच्या लोकांना सुपूर्द केले.  यावेळी दोडे गुर्जर भवन समितीचे माजी अध्यक्ष डॉ.एल.डी. चौधरी, सचिव सी. एस. पाटील, प्रा. डॉ. धनंजय चौधरी, अखिल भारतीय वीर गुर्जर महासभेचे राष्ट्रीय सोशल मीडिया अध्यक्ष पत्रकार वसंतराव पाटील, अनिल चौधरी, डी.एम. पाटील, समाधान पवार, लक्ष्मण गुर्जर, केदार पाटील, श्रीकृष्ण पाटील, मघन चौधरी आदी समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमात प्रास्तविक मघन भाऊसाहेब यांनी केले. सुत्रसंचालक प्रा. धनंजय चौधरी यांनी केले तर आभार सी. एस. पाटील यांनी मानले.

यावेळी तालुक्यातील गुर्जर समाजाचे समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात नगरपालिककेच्या नगराध्यक्षा पुष्पलता पाटील व माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या सह नगरसेवकांचे  आभार व्यक्त करण्यात आले

 

Protected Content