भोजे येथील तरुणाची गळफास घेऊन आमहत्या

पाचोरा, प्रतिनिधी |     तालुक्यातील भोजे येथील एका ३० वर्षीय तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. घटनेबाबत पिंपळगाव (हरेश्र्वर) पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असुन घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक कृष्णा भोये यांचे मार्गदर्शनाखाली पी. एस. आय. डिगंबर थोरात हे करीत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, भोजे ता. पाचोरा येथील रहिवाशी योगेश संतोष पवार (वय – ३० ) याने दि. ९ रोजी सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घराच्या छताला गळफास लावून आत्महत्या केली. घटनेप्रसंगी घरात कोणीही नव्हते. त्याचे  आई व वडिल बाहेर गेलेले होते. काही वेळानंतर आई घरी परतल्यानंतर त्यांना योगेश हा घराच्या छताला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यास तात्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी मृत घोषित केले. घटनेप्रकरणी पिंपळगाव (हरेश्र्वर) पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक कृष्णा भोये यांचे मार्गदर्शनाखाली पी. एस. आय. डिगंबर थोरात हे करीत आहे. मयत योगेश पवार याचे पाश्चात्य आई, वडिल, एक भाऊ, एक बहीण असा परिवार आहे. योगेश पवार याने आत्महत्या का केली ? याचे कारण समजू शकले नाही.

Protected Content