पारोळा येथे एड्स जनजागृती सप्ताहानिमित्त मार्गदर्शन

पारोळा प्रतिनिधी । बहादरपूर येथील रा. का. मिश्र विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात एड्स जनजागृती सप्ताहानिमित्त मार्गदर्शन करण्यात आले.

विद्यालयातील सकाळ सत्रात कनिष्ठ महाविद्यालय कला व वाणिज्य शाखेतील विद्यार्थी तर दुपार सत्रात नववी ते बारावी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना एड्स या रोगाविषयी उद्बोधन करण्यात आले. यात प्रामुख्याने ज्येष्ठ विज्ञान शिक्षक एस. बी. चौधरी यांनी यासंदर्भात विविध उदाहरणे देऊन रोग होण्याची कारणे, यावर उपाय, त्याची लक्षणे, रेड रिबन, व खबरदारी यासंदर्भातल सखोल असे मार्गदर्शन केले. तर ज्येष्ठ विज्ञान शिक्षक आर. पी. बडगुजर यांनी एड्स बाबत सावधानतेचा पवित्रा घेऊन कशी काळजी घ्यावी, या संदर्भात सखोल मार्गदर्शन केले. विशेषतः विद्यार्थीनींसाठी त्यांच्या विविध समस्यांवर विस्तृत अशी चर्चा करण्यात आली. काही विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.

सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य बापुसो एम.पी. शिवदे हे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी व्ही. सोनार यांनी केले. तर आभार प्रदर्शन व्हि. के. परदेशी यांनी केले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू-भगिनी सहकार्य केले. या कार्यक्रमाला सर्व विद्यार्थी हजर होते.

 

Protected Content