Home Cities जळगाव उपमुख्यमंत्र्यांकडे स्वस्तधान्य दुकानदार संघटनेने मांडल्या विविध समस्या

उपमुख्यमंत्र्यांकडे स्वस्तधान्य दुकानदार संघटनेने मांडल्या विविध समस्या

0
27

जळगाव, प्रतिनिधी | उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांची सरकारमान्य स्वस्तधान्य दुकानदार संघटनेच्या अध्यक्ष अनिल अडकमोल यांनी भेट घेवून रेशन दुकानदारांच्या विविध समस्यांचे निवेदन दिले.

 

आज शुक्रवार दि. १७ डिसेंबर रोजी उपमुख्यमंत्री ना. अजित पवार हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. त्यांची सरकारमान्य स्वस्तधान्य दुकानदार संघटने अध्यक्ष अनिल अडकमोल यांच्या नेत्तृत्वाखाली शिष्टमंडळाने शासकीय अजिंठा विश्रामगृह येथे भेट घेवून निवेदन दिले. याप्रसंगी ना. अजित पवारांनी राज्यभरातील रेशन दुकानदारांना निश्चितच न्याय मिळेल अशी भूमिका मांडली. तसेच ज्या लाभार्थीचे बॉयोमॅट्रीक होत नाही यासंदर्भात शासन विचारधीन आहे असे सांगितले. याप्रसंगी फिरोज पठाण डिगंबर मोरे हेमरत्न काळुखे, किरण कोळी ,अतुल हराळ, बबलू शेख, लियाकत खान, प्रताप बनसोडे, शैलेश परदेशी, गणेश जोगी, श्याम नाथ, बाळा महागडे आदी उपस्थित होते,


Protected Content

Play sound