वंचित बहुजन आघाडीच्या धसक्याने शरद पवारांची माघार : प्रकाश आंबेडकर

pk 201809136729

मुंबई (प्रतिनिधी) माढा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने मोठी ताकद निर्माण केली आहे, त्यामुळेच पवारांनी धसका घेऊन माघार घेतली असावी, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. दरम्यान,राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांकडून पवार यांच्या भूमिकेवरुन प्रतिक्रिया येत आहेत.

 

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केले. त्यानंतर, रामदास आठवलेंनीही कोल्हापुरातील पत्रकार परिषदेत बोलताना, अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. तर, शरद पवार यांच्या निवडणूक न लढविण्याच्या भूमिकेवरही आठवलेंनी खास त्यांच्या शैलीत पवारांची खिल्ली उडवली. पंतप्रधान पदासाठी आपला नंबर लागेल असे पवारांना वाटले म्हणून ते लोकसभा लढणार होते. पण, आता युतीचे सरकार येणार असल्यानेच त्यांनी माघार घेतली असेल, असे आठवले म्हणाले. त्यानंतर, आता प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे की, माढा मतदार संघात वंचित बहुजन आघाडीने मोठी ताकद निर्माण केली आहे. माढा मतदारसंघात आमचा प्रभाव वाढला आहे. त्यामुळे, याचा धसका शरद पवार यांनी घेतला असावा. म्हणूनच त्यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याचे म्हटले आहे.

Add Comment

Protected Content