Home Cities जामनेर संत सेवालाल महाराज जयंती टाळणाऱ्या ग्रामपंचायतीवर कारवाईची मागणी (व्हिडिओ)

संत सेवालाल महाराज जयंती टाळणाऱ्या ग्रामपंचायतीवर कारवाईची मागणी (व्हिडिओ)

0
31

 

 

जामनेर, प्रतिनिधी । तालुक्यातील पहूर येथून जवळच असलेल्या पिंपळगांव कमानी येथे शासकीय परिपत्रक असून देखील ग्रामपंचायत प्रशासनाने सोमवार दि.१५ फेब्रुवारी रोजी जगतगुरु संत सेवालाल महाराज यांची २८२वी जयंती साजरी न केल्याने ग्रामपंचायत प्रशासनावर तात्काळ कारवाई करावी अन्यथा उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

जगतगुरु संत सेवालाल महाराज यांची २८२वी जयंती साजरी करण्याबाबत शासकीय परीपत्रक/जी.आर. असताना देखील येथील ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने ही जयंती साजरी करण्यात आली नाही. याबद्दल जय सेवालाल बहुउद्देशीय संस्था आणि समस्त ग्रामस्थांनी या प्रशासनाचा धिक्कार करीत जाहिर निषेध केला.

या प्रकरणाची वरीष्ठ अधिकारी यांनी सखोल चौकशी करुन दोषींवर तात्काळ कारवाई करावी अन्यथा जय सेवालाल बहुउद्देशीय संस्था आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीने उपोषण करण्यात येईल असा  इशारा माजी ग्रामपंचायत सदस्य तथा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक चव्हाण, सचिव विठ्ठल चव्हाण, उपसरपंच काळू नाईक(राठोड), संस्थेच्या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्या तथा संचालिका अनुसया चव्हाण, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य कैलास चव्हाण, संस्थेचे संचालक विकास चव्हाण आणि समस्त ग्रामस्थ यांनी दिला आहे.

 

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/410028170297834

 


Protected Content

Play sound