खासदार रक्षा खडसे यांनी नुकसानीची केली पाहणी

बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीची बोदवड तालुक्यातील नाडगाव, वाकी, शेलवड, येवती, लोणवाडी, धोंडखेड व बोदवड ई. ठिकाणी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी भाजपा पदाधिकारी, महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली, तसेच तत्काळ पंचनामे करण्याच्या संबंधितांना सूचना केल्या.

अवकाळी पाऊस व जोरदार वादळामुळे बोदवड तालुक्यातील उभ्या पिकांचे तसेच राहत्या घरांचे खूप मोठे नुकसान होऊन शेतकऱ्यांचे व ग्रामस्थांचे कंबरडे मोडले गेले असून, त्यांना लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी आपल्या परीने प्रयत्न करणार असल्याबाबत खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांना यांना आश्वासन देऊन धिर दिला.

Protected Content