भरधाव ट्रकने कारला धडक दिल्यामुळे चार जण जागीच ठार

लातूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भरधाव ट्रकने कारला दिलेल्या धडकेत ४ जण जागीच ठार झाल्याची घटना लातूरच्या देवणी तालुक्यात घडली आहे. मृत व्यक्ती मध्य प्रदेशातील इंदूरचे कापड व्यापारी असल्याचे सांगण्यात येत आहे. उदगीर -निलंगा राज्य मार्गावरील धनेगावाजवळ बुधवारी दुपारी ही घटना घडली. ही धडक एवढी भयंकर होती की, त्यात कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. यामुळे कारमधील प्रवाशांना बाहेर पडण्याची कोणतीही संधी मिळाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, MP 09 DE 5227 क्रमांकाची कार वलांडीहून निलंग्याकडे जात होती. या कारला विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने (MH 25 J 7365) उदगीर – निलंगा राज्य मार्गावरील धनेगावाजवळ जोराची धडक दिली. त्यात कारमधील 4 जणांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की, त्यात कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. या घटनेची माहिती मिळताच देवणी पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मृतदेह जेसीबीच्या मदतीने बाहेर काढून शवविच्छेदनासाठी वलांडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले. पोलिसांच्या माहितीनुसार, या अपघात ठार झालेले चारही जण मध्य प्रदेशाच्या इंदूरचे कापड व्यापारी असल्याची प्राथमिक आहे. सध्या त्यांची ओळख पटवण्यात येत आहे.

Protected Content